ओबीसी, भटके विमुक्त, धनगर समाजाला शिवसेनाच न्याय देईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओबीसी, भटके विमुक्त आणि धनगर समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. मंगळवारी विविध समाजांतील प्रमुख नेत्यांची बैठक शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी या समाजातील लोकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन एक ना एक दिवस पूर्ण करणारच! उद्धव ठाकरे

ओबीसी-व्हीजेएनजी समाजाचे प्रमुख घटक असलेले धनगर, कुणबी, बंजारा, माळी, तेली, आगरी कोळी आदी समाजातील लोकसंख्या मोठी असून या समांजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. याविषयी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते युनूस मणियार यांच्याशीही विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला ओबीसी व्हीजेएनटी समाजाचे नेते, धनगर समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे, बंजारा आणि भटक्या समाजाचे प्रणेते हरिभाऊ राठोड, कुणबी समाज संघाचे अध्यक्ष भूषण बरे, उपाध्यक्ष तुकाराम लाड, मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते युनूस मणियार, उद्योगपती दीपक दहिफळे, वंजारी समाजाचे नितीन घुगे आणि प्रमोद खेडकर आदि उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख हा माझा जणू दुसरा प्राण, प्रदीप शर्मा यांची आदरांजली