
यंदा पाऊस जरा जास्तच लांबला आहे. या पावसाने शेवटच्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागांना जबरदस्त तडाखा दिला आहे. या वर्षीचा पाऊस हा जीवघेणा ठरला असून आतापर्यंत त्याने दीड हजारापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडच्या भागात पावसाने थैमान घातले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील 14 राज्यांमध्ये एकूण 1685 लोकांना पावसामुळे जीव गमवावा लागला आहे. गेल्या 25 वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक मोसमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे देशातील तब्बल 277 जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली होती.
बिहारच्या पुराला हस्त नक्षत्रातला पाऊस जबाबदार, केंद्रीय मंत्र्यांचा अजब तर्क
यंदाच्या पावसामुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात एकूण 377 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात गेल्या चार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे गेलेल्या बळींची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. महाराष्ट्राखालोखाल पावसामुळे बळी गेलेल्यांची सर्वाधिक संख्या ही पश्चिम बंगालमध्ये आहे. या राज्यात 225 जणांचा जीव गेला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसामुळे काय हानी झाली याचा रोज आढावा घेतला जातो. जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात पावसाने 377 जणांचा बळी घेतल्याचे उघड झाले आहे. या पावसाचा फटका राज्यातील विविध भागात असलेल्या 7 लाख 73 हजार 299 नागरिकांना बसला आहे. आसाम आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये मोसमी पावसादरम्यान अनुक्रमे 97 आणि 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची अजूनही चिन्हे दिसत नाहीये. असा अंदाज वर्तवला जात आहे की 10 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होऊ शकते. असं झाल्यास पावसाच्या परतीसाठी झालेला हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक विलंब असेल. इतिहासात डोकावले तर यापूर्वी 1960 साली 1 ऑक्टोबरला तर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला होता. सर्वसाधारणपणे परतीचा पाऊस पावसाच्या परतीची सुरुवात 1 सप्टेंबरला सुरू होतो, तो साधारण पंधरा-वीस दिवसांत पूर्ण होतो. मात्र या वर्षी हा प्रवास 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

























































