
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 19 ते 21 ऑक्टोबर या तीन दिवशी तसेच निवडणूक निकालाचा दिवस असलेल्या 24 ऑक्टोबरला दारू विक्री बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी रविवारी यासंदर्भात आदेश दिले. राज्यात विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया आणि निकालादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी मुंबईतील सर्व दारू दुकानांना चार दिवस सर्व प्रकारची दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
























































