
भारतीय जनता पक्षाच्या वॉररूमची पाहणी व त्याचे उद्घाटन करण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी नांदेडला आलेल्या विनोद तावडे यांनी अशोक चव्हाणांना दिलेल्या सल्ल्याची सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खिल्ली उडवली. ‘मला सल्ला देणाऱ्या तावडे यांचा नियतीनेच विनोद केला असून, त्यांनी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, आम्ही उमेदवारी देऊ’, असा खोचक टोला लगावला.
‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान
मल्टीपर्पज हायस्वूâलच्या मैदानावर नांदेड दक्षिणच्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ पुâटला, त्यावेळी ते बोलत होते. 24 सप्टेंबर रोजी राज्याचे मंत्री विनोद तावडे हे नांदेडला आले असताना त्यांनी लोकसभेत पराभूत झालेल्या अशोक चव्हाणांनी उरलीसुरली पत वाचविण्यासाठी भोकर विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा सल्ला पत्रकार परिषदेत दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर तेव्हाच अशोक चव्हाण यांनी मला सल्ला देण्यापेक्षा पक्षाच्या अंतर्गत बाबीकडे लक्ष द्या, असा टोला मारला होता.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार
दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाने विनोद तावडे यांना तिकीट नाकारल्याने त्याची एकच चर्चा सुरू झाली होती. याचा धागा धरत सोमवारी रात्री अशोक चव्हाण यांनी या सभेत तावडे यांची चांगलीच खिल्ली उडवली. नांदेडमध्ये येऊन मला सल्ला देणाऱ्या तावडे यांचे आता हसे झाले आहे. आता विनोद तावडे यांचा नियतीनेच विनोद केला आहे. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी आता लवकरच काँग्रेसमध्ये यावे, काँग्रेस पक्षात मी तुम्हाला तिकीट देतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. आपल्याला सल्ला देऊन तावडे यांनी स्वत:चे हसेच करून घेतले आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट नाकारून विनोद तावडेंसोबत आता नियतीनेच विनोद केला, अशी कोपरखळी त्यांनी मारली.




























































