साप घेऊन गरबा खेळणे पडले महागात, तुरुंगात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये नवरात्र हा लोकप्रिय उत्सव आहे. या उत्सवात गुजराती लोक गरबा खेळतात. परंतु गुजरातमध्ये साप घेऊन गरबा खेळणे काही महिलांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली.

https://www.youtube.com/watch?time_continue=52&v=jzv4GeLoAiY

गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा काही महिला हातात साप घेऊन गरबा खेळत होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी गीता डाकी (28) व दोन अल्पवयीन मुलींना अटक केली. तसेच या कार्यक्रमाच्या दोन आयोजकांनाही अटक करण्यात आली होती. शुक्रवारी सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

सदर महिला आणि मुली एक कोब्रा आणि साधे साप घेऊन नाचत होते. सुरक्षेचा उपाय म्हणून कोब्राचे दात काढून टाकण्यात आले होते. तर इतर दोन साप हे बिनविषार होते.

गारूडी समाजाचा हा कार्यक्रम होता अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच अशा प्रकारे साप घेऊन नाचणे ही त्यांची परंपरा असल्याचे त्यांच्या समाजातील काही लोकांनी सांगितले. पण अशा प्रकारे साप घेऊन नाचणे हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून ही कारवाए करण्यात आली असे पोलिसांनी नमूद केले.