हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे 20 हजार कर्मचारी बेमुदत संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्करी साहित्याची निर्मिती करणाऱ्या ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’मधील 20 हजार कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून या संपामध्ये नाशिकमधील ओझर येथील 3500 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ ही लष्करी विमान निर्मिती करणारी सरकारी पंपनी आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील कामगार संघटनांच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या पत्रात 35 टक्के पगारवाढ करण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने 8 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांसमोर मांडला. त्याशिवाय अधिकारी आणि कामगारांना असलेल्या भत्त्यांमध्ये असमान वाढ असून अधिकारी आणि कामगारांना समान वाढ मिळाली पाहिजे अशी मागणीही कामगार संघटनांनी केलेली आहे.

  • हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड कामगार युनियनचे महासचिव एस. चंद्रशेखर म्हणाले, ‘व्यवस्थापनाशी सलोखापूर्ण चर्चा करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. आमच्या मागण्या विशेषतŠ वेतनासंदर्भातील पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत.
  • सुधारित वेतन श्रेणी 1 जानेवारी 2017 पासून लागू करण्यासाठी कामगारांनी पुकारलेला हा संप टाळण्यासाठी व्यवस्थापन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे,’ असे पंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.