
#MahaElection विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 19 लाख 15 हजार 918 मतदार 79 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 2013 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून मतदान केंद्रापर्यंत साहित्य घेऊन जाण्यासाठी व मतदानानंतर साहित्य परत घेऊन येण्यासाठी प्रशासनाने 380 वाहनांची व्यवस्था केले आहे.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 79 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये 15 उमेदवार, लातूर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये 19 उमेदवार, अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ९ उमेदवार, उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये 12 उमेदवार, निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 उमेदवार तर औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा लाख दहा हजार सहा पुरुष मतदार तर नऊ लाख 3 हजार सात स्त्री मतदार इतर तीन मतदार तर 2902 सैनिक मतदार आहेत. एकुण मतदार संख्या 19 लाख 15 हजार 918 एवढी आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 69 हजार 504 पुरुष मतदार एक लाख 52 हजार 467 स्त्री मतदार इतर 1 व 358 सैनिक मतदार अशी एकूण तीन लाख 22 हजार 330 मतदार संख्या आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 94 हजार 376 पुरुष 1 लाख 77 हजार 992 स्त्री इतर 1 व 105 सैनिक मतदार असे एकूण 3 लाख 72 हजार 474 मतदार संख्या आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एक लाख 70 हजार 192 पुरुष 1 लाख 50 हजार 291 स्त्री मतदार 844 सैनिक मतदार असे एकूण 3 लाख 21 हजार 327 मतदार संख्या आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 58 हजार 260 पुरुष 1 लाख 40 हजार 179 स्त्री सातशे सैनिक मतदान असे एकूण 2 लाख 99 हजार 139 मतदार आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 66 हजार 928 पुरुष मतदार एक लाख 49 हजार 363 मतदार इतर 1 व 398 सैनिक मतदार असे एकूण 3 लाख 16 हजार सहाशे नव्वद मतदार आहेत . औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख 50 हजार 740 पुरुष मतदार 1 लाख 32 हजार 715 मतदार 497 सैनिक मतदार असे एकूण 2 लाख 83 हजार 958 मतदार आहेत.

























































