
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवा पेटला असून ही आग आता लॉस एंजेलिस या शहरापर्यंत येऊन पोहचली आहे. या आगीत हॉलीवूड कलाकारांसह अनेक व्हीव्हीआयपी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची घरे जळून खाक झाली आहेत. तसेच महागड्या दारुचे जुने कारखानेही या आगीत भस्मसात झाली आहेत. याआगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या बुधवारी ही आग कॅलिफोर्नियातील जंगलात लागली होती. पण आगीचे वेग व झपाटा वेगवान असून हवेमुळे ही आग पसरत लॉस एंजेलिस शहरापर्य़ंत् पोहचली आहे. यामुळे अनेकजण आपला सामान तेथेच टाकून दुसरीकडे आश्रयास गेले आहेत.
ही आग प्रामुख्याने सोनोमा कौंटी नावाच्या परिसरात लागली आहे. हा परिसर बिअर आणि इतर मद्यासाठी प्रसिद्ध आहे. याला किनगेड फायर असेही म्हटले जाते. ही आग 21,900 एकर क्षेत्रात पसरली आहे. तसेच लॉस ऐंजलिसमधूनही ही आग येथे पसरत आहे. या आगीला गेटी फायर असेही म्हटले जाते. या परिसरात हॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते, अर्नाल्ड श्वार्जनेगर, कार्ल ग्रेग, बॉस्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स यांसारख्या व्हीव्हीआयपीजची घरे आहेत. आगीचा धोका पाहता त्यांना घरं रिकामं करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल 10 हजार घर रिकामी करण्यात आली आहेत. या आगीत 150 वर्ष जुनी मद्य फॅक्टरी , कोट्यवधी डॉलर्स व अनेक सामान जळून खाक झाले आहेत.



























































