
संभाजीनगरमध्ये आपल्या मुलाला वाचवताना एका महिलेचा डबक्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सदर महिला भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी आली होती. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
भाऊबीजेसाठी महिला आअल्या माहेरी आली होती. तेव्हा एका डबक्याजवळ तिचा मुलगा खेळत होता. खेळता खेळता मुलाचा पाय घसरून डबक्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी महिलेने डबक्यात उडी मारली. तिला पोहता येत नसल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाचा मृतदेह सापडला आहे. परंतु आईचा मृतदेह अजून सापडला नाही.






























































