
आजाराला कंटाळून भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी दीपक घाटगे यांनी राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेउैन आत्महत्या केल़ी ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. आजारी असतानादेखील त्यांनी निवडणुकीत कार्य केल्यानेच ते तणावात राहत होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सातारा परिसरातील उैर्जानगरातील दीपक रामराव घाटगे (45) हे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी होते. आजारी असतानाही वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी निवडणुकीचे काम केले होते. आजारपणामुळे ते नेहमी तणावात राहत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी साडीच्या पदराने गळफास घेतला. रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱयांनी घाटीच्या दिशेने धाव घेतली होती. दिवसभर शवविच्छेदनगृहात ठाण मांडून बसल्याने पोलिसांसह घाटीच्या डॉक्टरांची तारांबळ उडाली होती. दीपक घाटगे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही.
























































