लाडक्या कुत्र्यापासून दूर केले म्हणून तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूत एका तरुणीला तिच्या लाडक्या कुत्र्यापासून तिला दूर केले. हे दुःख तिला सहन नाही झाले म्हणून तिने आत्महत्या केली आहे.

तमिळनाडू कोईंबतूर शहरात कविता ही तरुणी राहत असून ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. पावसाळ्यादरम्यान जोरजोरात विजा कडाडत होत्या. तेव्हा कविताचा कुत्रा घाबरून भुंकायला लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला. शेजार्‍यांनी याबाबत कविताच्या वडिलांकडे तक्रार केली.

कविताचे वडील कवितावर खूप चिडले आणि कुत्र्याला दूर कुठेतरी सोडण्यास सांगितले. यावर कविता खूप दुखी झाली आणि पंख्याला लटकून तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कविताने चिठ्ठी लिहिली आणि आपल्या लाडक्या कुत्र्याची काळजी घेण्यास आपल्या कुटुंबीयांना सांगितले.