तुमचा टीव्हीही आता होऊ शकतो स्मार्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या टीव्हीचे रूपांतर आता स्मार्ट टीव्हीमध्ये करून मनोरंजन आणि माहितीचा खजिना घरबसल्या मिळविता येणार आहे. फ्लिपकार्टने ‘मार्क्यू बाय फ्लिपकार्ट’अंतर्गत एक स्ट्रिमिंग स्टिक बाजारात आणली आहे. या स्टिकमुळे टीव्हीचे रूपांतर स्मार्ट टीव्हीत करता येते. अँड्रॉइड 9.0 ने सुसज्ज असलेल्या या स्टिकमुळे गुगल प्लेचा वापर घरातील टीव्हीसाठीही करता येणार आहे. तसेच अँड्रॉइड फोनही टीव्हीशी कनेक्ट करता येणार आहे. स्ट्रिमिंग स्टिकची किंमत 3499 रुपयांपासून सुरू होते. फ्लिपकार्टच्या खासगी ब्रँडस्, इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्मिचर विभागांचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदर्श मेनन म्हणाले, ‘स्ट्रीमिंग डिव्हाइस आणि स्मार्ट टीव्हीची भूक मेट्रो शहरांबाहेर वाढते आहे. ही भूक भागविण्यासाठी मार्क्यू टर्बोस्ट्रीम डिझाईन केली आहे.’