
पुढील वर्षात म्हणजे 2020 साली हिंदुस्थानात खासगी क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचा आनंददायक अहवाल विलीस टॉवर वॉटसन यांच्या ‘सॅलरी बजेट प्लानिंग’ या सर्वेक्षणात देण्यात आला आहे. या वर्षी कर्मचाऱयांचा पगार 9.9 टक्क्यांनी वाढला असून पुढच्या वर्षी तो 10 टक्क्यांनी वाढेल असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
याच कालावधीत इंडोनेशियात 8 टक्के दराने, चीनमध्ये 6.5 टक्क्यांनी, फिलिपाइन्समध्ये 6 टक्क्यांनी, तर हाँगकाँग व सिंगापूर येथे 4 टक्के दराने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांचे वेतन वाढणार असल्याचा अंदाजही विलीस टॉवर वॉटसन यांनी व्यक्त केला आहे. या कंपनीचे हिंदुस्थानातील प्रमुख राजुल माथूर यांनी याबाबत सांगितले की, आशिया खंडात हिंदुस्थानात पगारात सातत्याने वाढ होत आली आहे, मात्र तेथील कंपन्या आता सतर्क झाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.






























































