झारखंड विधानसभा निवडणूक; भाजपकडून पहिली यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांना जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपचे राज्य अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांना चक्रघरपूर मतदारसंघातून भाजपने रिंगणात उतरविले आहे. राजधानी दिल्लीतील झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भाजप उमेदवारांची पहिली यादी घोषित केली.

राज्यात 5 टप्प्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 30 नोव्हेंबरला असून, अखेरचा टप्पा 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तर, मतमोजणी 23 डिसेंबरला होणार आहे.