वर्षभरात देशभरात पाच कोटींची संपत्ती चोरीला; दिल्ली नंबर वन, मुंबईचा क्रमांक…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात प्रदूषणात पहिल्या क्रमांकावर असलेले दिल्ली शहर मालमत्ता चोरीच्या घटनांत अव्वलच ठरले आहे. 2017च्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार दिल्लीत 1 लाख 61 हजार तर मुंबईत 9 हजार 718 गुन्हे दाखल आहेत. तर वर्षभरात देशात पाच कोटींची संपत्ती चोरीला गेली आहे.

नुकतीच ‘एनसीआरबी’ने 2017 मधील आकडेवारी प्रसिद्ध केली. देशात सुमारे पाच हजार दोन कोटी रुपयांच्या मालमता चोरीला गेल्या आहेत. त्यातील 1521 कोटींच्या मालमत्ता या महाराष्ट्रातील आहेत. यात मुंबईचा क्रमांक तिसरा आहे. साधारण दिवसाला 14 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला जात आहे. या आकडेवारीनुसार देशात एकूण मालमत्तेमध्ये 30 टक्के चोर्‍या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. मालमत्ता चोरीचे प्रमाण वाढत असताना मुद्देमाल परत मिळण्याचे प्रमाण कमी म्हणजेच एकूण गुह्यापैकी 26 टक्के आहे.