जुगार खेळणाऱ्या 17 जणांना रंगेहाथ पकडलं, नगरच्या कोतवाली पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथील कोतवाली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. कायनेटिक चौक, इलाक्षी शोरूम मागे, यशोधन हॉटेलजवळ एका खोलीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ चालू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 17 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महा.जु.का.कलम 4, 5 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल शाहीद सलीम शेख, नेमणुक- कोतवाली पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी बंडु मिठ्राव दारूनकर (43), सुशांत संजय फुंदे (28), पोपट भानुदास मोरे (40), ज्ञानेश्वर मन्छिंद्र दौडकर (32), मुकेश प्रताप कंडारे (31), आरीफ मेहबुब शेख (42), श्रीकांत धोंडीराम फसले (33), प्रशांत रामदास भुसारे (27), गणेश पोपट लोंढे (29), अनिल वामोवर सातपुते (38). पोपट रामभाऊ औटी (58), इमाम इब्राहीम पठाण (62), मनोहर बिश्काथ कोडम (44), किरण बबनराव मुके (6), सचिन सुरेश दिवाने (33), राविन काशिनाथ उदगीरकर (36), विजय ज्ञानदेव गायकवाड (30), हे इलाक्षी शोरुमच्या मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ असल्याचे आढळून आले.

त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये त्यात दहा हजार रुपये रोख रक्कम व सव्वा लाख रुपयांचे मोबाईल व एक करीझ्मा मोटारसायकल व तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.