सुभाष चंद्रा यांनी दिला झी एंटरटेन्मेंटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झी एंटरटेन्मेंटचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा बोर्डाने स्वीकारला आहे. दरम्यान त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून राहणार आहेत.

सेबीच्या 17 (1बी) या नियमानुसार एखाद्या कंपनीच्या अध्यक्षाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी यांच्यात कोणत्याही प्रकारचे संबंध असू नयेत, असा नियम आहे. त्या पार्श्वभूमीवर सुभाष चंद्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो तत्काळ मंजूर केल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.