
दोन हजाराची नोट चलनातून कमी होत आहे. त्यामुळे ही नोट बंद होणार का असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. म्हणून दोन हजाराची नोट बंद होणार का अशा प्रश्न संसदेत विचारला गेला. त्यावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले की दोन हजारांची नोट बंद होणार नाही.
दोन वर्षापूर्वी नोटबंदी होऊन 500 आणि एक हजारच्या नोटा केंद्र सरकारने रद्दबातल केल्या होत्या. त्यानंतर सरकारने पाचशेची आणि दोन हजारची नवी नोट आणली होती. गेल्या काही दिवसांत दोन हजारची नोट चलनातून गायब होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा नोटबंदी होऊन दोन हजारांची नोट बंद होणार असा लोकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे सरकार आता दोन हजारांची नोट बंद करणार आहे का? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. ही नोट बंद होणार नसल्याचे अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार एकूण चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे 31.18 टक्के इतके आहे. तर त्यांची किंमत ही 6 हजार 582 अब्ज इतकी आहे.
























































