
ट्रेनमध्ये पबजी खेळता खेळता एका तरुणाने चुकून पाण्याऐवजी अॅसिड प्यायल्याची धक्कादायक घटना ग्वालिअर येथे घडली आहे. अॅसिड प्यायल्यानंतर त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ शर्मा (20) असे त्या तरुणाचे नाव असून त्याला पबजी हा गेम खेळायचे व्यसन होते.
सौरभ हा त्याचा मित्र संतोष शर्मा यांच्यासोबत ग्वालिअरवरून आग्र्याला ट्रेनने जात होता. प्रवासाच्या वेळी संतोषने त्याची बॅग सौरभकडे दिली होती. त्या बॅगेत एक पाण्याची बाटली व एक दागिने पॉलिश करणाऱ्या अॅसिडची बाटली ठेवलेली होती. प्रवासात सौरभ पबजी खेळत होता तर संतोष झोपलेला होता. त्यावेळी अचानक संतोषला सौरभच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा सौरभच्या हातात त्याला पॉलिश अॅसिडची बाटली दिसली. पबजी खेळता खेळता सौरभने पाण्याऐवजी अॅसिडची बाटली बाहेर काढली व तो त्यातलं अॅसिड प्यायला. संतोषने मदतीसाठी आरडा ओरड केल्यानंतर ट्रेनमधील टीसीने वैद्यकीय मागवली. मात्र तोपर्यंत सौरभचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,
























































