अवैध वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बेलवंडी पोलिसांचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी व विसापूर येथील नदीच्या पात्रात अनाधिकृतपणे, विनापरवाना चोरून वाळूउपसा करणाऱ्यांवर बेलवंडी पोलिसांनी बुधवार 12 रोजी दुपारी छापा टाकून सुमारे 59 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाळू तस्करी करणारे चालक-मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी दुपारी अहमदनगर पोलीस व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी व विसापूर येथील नदीच्या पात्रात काही इसम पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करत आहेत. ही माहिती मिळताच पो. नि. अरविंद माने, बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व नगर पोलीस हे नदी पात्रात जाऊन वाळू उपसा होत असल्याची खात्री करून घेतली. खात्री झाल्यानंतर त्यांनी सापळा रचून वाळू वाहतूक करत असलेले 59 लाख 30 हजार रुपये किमतीचे 1 पोकलेन, 1 ट्रक व 1 ट्रॅक्टर जागीच पकडले.

पकडलेले ट्रक व त्यांतील वाळूसह पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आले असून सदर बाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांच्या दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येऊन. आरोपी दीपक नामदेव केंदळ (रा. दूरगाव, ता. कर्जत.), पोकलेन चालक राजू छोटेलाल सिंग (रा. विरादेवी मध्यप्रदेश), पोकलेन मालक आबा पांडुरंग कोळपे (रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पोकलेन चालक राजू छोटेलाल आरोपी दीपक नामदेव केंदळ यांना अटक करण्यात आली तर पोकलेन मालक आबा पांडुरंग कोळपे हा फरार झाला आहे. ही कारवाई पोलीस उपधिक्षक कर्जत संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.फौ.गवळी, पो.ह.मधुकर सुरवसे, संभाजी शिंदे, पो.ना. झावरे, पो. हे. कॉ. विजयकुमार वेठेकर, पो.कॉ. देशमुख, पो. कॉ.ज्ञानेश्वर पठारे, पो. कॉ. बारवकर, यांनी केली आहे.