निर्भयाचा आरोपी म्हणतोय ‘त्या’ घटनेवेळी मी अल्पवयीन होतो, प्रकरण हाय कोर्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पवन कुमार गुप्ता याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डिसेंबर, 2012 रोजी ही घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन होतो असा दावा आरोपीने केला आहे. या घटनेनंतर ऑसिफिकेशन टेस्ट (हाडांच्या घनतेची चाचणी) झाली नव्हती आणि या गोष्टीचा फायदा मिळायला हवा, असे आरोपीने म्हटले आहे. आरोपीच्या याचिकवर उद्या 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

याआधी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातीलचारही आरोपींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर बुधवारी पतियाळा न्यायालयात सुनावणी झाली. याची सुनावणी पतियाळा न्यायालयाने 7 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.

डेथ वॉरंटवरील सुनावणी पुढे ढकलल्याने निर्भयाच्या आई नाराज, न्यायालयात अश्रूंचा बांध फुटला

ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय?
ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे हाडांच्या घनतेची चाचणी असते. हाडांच्या घनतेवरून मानवाच्या वयाचे निदान होऊ शकते. आरोपी अल्पवयीन आहे अथवा नाही हे देखील या चाचणीतून स्पष्ट होऊ शकते.