आधीपासून पाकिस्तानी असलेल्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व कशाला? चिदंबरम यांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
p-chidambaram

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेस नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. जे आधीपासूनच पाकिस्तानचे नागरिक आहेत, त्यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व कशाला दिले पाहिजे? याबाबत पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आव्हानाला काय अर्थ आहे, असा सवाल चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींना केला. काँग्रेस व त्यांच्या मित्रांनी हिम्मत असेल तर सर्व पाकिस्तानींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याची जाहीर घोषणा करावी, असे आव्हान पंतप्रधान मोदींनी मंगळवारी झारखंड येथील सभेत बोलताना दिले.

त्यावर चिदंबरम यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. जे आधीच पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना आम्ही हिंदुस्थानचे नागरिकत्व का दिले पाहिजे? विरोधकांना अशा प्रकारची आव्हाने देण्याला काय अर्थ आहे? असा सवाल करणारे ट्विट चिदंबरम यांनी केले.