
क्रिकेटच्या दुनियेत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आणि लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गुरुवारी झालेल्या लिलावात अनेक क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. ‘आयपीएल’च्या 13व्या हंगामासाठीच्या बहुचर्चित लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू पॅट कमिन्स हा सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरला. कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी 50 लाख रुपये मोजले. पॅट कमिन्स ‘आयपीएल’च्या इतिहासात दुसऱया क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. युवराज सिंगला 2015मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने 16 कोटी रुपये मोजले होते, तो विक्रम अबाधित राहिला.
पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपये ही दुसऱया क्रमांकाची किंमत मिळाली. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघात घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू ख्रिस मॉरिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केले.
लिलावात विकले गेलेले प्रमुख खेळाडू
- मुंबई इंडियन्स – कुल्टर नाईल (ऑस्ट्रेलिया)- 8 कोटी, ख्रिस लीन (ऑस्ट्रेलिया)- 2 कोटी.
- चेन्नई सुपर किंग्ज – पियूष चावला (हिंदुस्थान) – 6.75 कोटी, सॅम कुरण (इंग्लंड) – 5.50 कोटी.
- कोलकाता नाइट रायडर्स – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – 15.50 कोटी, इयॉन मॉर्गन (इंंग्लंड) – 5.25 कोटी.
- राजस्थान रॉयल्स – रॉबिन उथप्पा (हिंदुस्थान) – 3 कोटी, जयदेव उनाडकट (हिंदुस्थान) – 3 कोटी, यशस्वी जैस्वाल (हिंदुस्थान) – 2.40 कोटी.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ख्रिस मॉरिस (द. आफ्रिका) – 10 कोटी, ऍरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) – 4.40 कोटी.
- किंग्ज इलेव्हन पंजाब – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) 10.75 कोटी, शेल्डॉन कॉटरेल (विंडीज) – 8.50 कोटी, रवी बिष्णोई (हिंदुस्थान) – 2 कोटी.
- दिल्ली कॅपिटल – शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडीज) – 7.75 कोटी, ऍलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया) – 2.40 कोटी, जेसन रॉय (इंग्लंड) – 1.50 कोटी, ख्रिस वोक्स (इंग्लंड) – 1.50 कोटी.
- सनरायझर्स हैदराबाद – मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया) – 2 कोटी, विराट सिंग (हिंदुस्थान) – 1.90 कोटी, प्रियाम गर्ग (हिंदुस्थान) – 1.90 कोटी.























































