लेडी गागाची ‘गंदी बात’ , म्हणाली शेवटची आंघोळ केव्हा केली ते माहितीच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाश्चिमात्य गायिका लेडी गागाचे जगभरात करोडो चाहते आहेत. लेडी गागा तिच्या विधानांमुळे आणि कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. दोन महिन्यांपूर्वी लेडी गागाने संस्कृत श्लोक ट्विट केले होते. आता लेडी गागा चर्चेत आली आहे ते तिनेच केलेल्या एका विधानामुळे. तिने जी खासगी बाब सांगितली आहे ती ऐकून अनेकांना धक्काही बसला आणि किळसही आली. लेडी गागाने म्हटलंय की तिने शेवटची अंघोळ केव्हा केली होती हे तिलाही आठवत नाहीये. अनेक दिवस आंघोळ न करण्यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

लेडी गागा तिच्या नव्या अल्बमच्या तयारीत आहे. तिने दावा केला आहे की ती या कामात इतकी गुंतलेली आहे की ती आंघोळ करायची आहे हेच विसरून गेली. लेडी गागाने ट्विटरवर आपल्या तिच्या सहाय्यकाशी झालेला दोन ओळींचा संवाद शेअर केला आहे. सहाय्यकाने तिला प्रश्न विचारला होता की ‘तू शेवटची आंघोळ केव्हा केली होतीस’ यावर लेडी गागाने उत्तर दिलं की ‘मला आठवत नाही’

या उत्तरावर काही जणांनी मिम्स तयार करुन थट्टा करायला सुरुवात केली तर काहीजणांनी तिचं कौतुक केलं बरय़ाच जणांनी तिला सल्ला दिला की अल्बम उशीरा झाला असता पण शरीराची स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. लेडी गागा सध्या तिचा चित्रपट “ए स्टार इज बॉर्न” च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील “शॅलो” या गाण्यासाठी तिला साठी 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तिने स्वत:चा मेकअप ब्रँडही सुरू केला असून त्याच्याही प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे.