
लातूर येथून जवळ असलेल्या वसवाडी येथील विवाहितेने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची बातमीस समोर येत आहे. वसवाडी येथील रहिवासी असलेली उर्मिला मस्के या विवाहितेने कुर्डूवाडी कडून लातूरकडे येणाऱ्या रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. सदरील विवाहितेस दोन अपत्य असल्याचे सांगण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

































































