#CAA हिंदू असणं पाप आहे का? नागपुरात समर्थनाच्या मोर्चात गडकरींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील मुसलमानांना आश्रय घेण्यासाठी 150 मुस्लिम राष्ट्र आहेत. मात्र या तीन देशांमध्ये अत्याचार होणाऱ्या अल्पसंख्यांना लोकांना हिंदुस्थानमध्ये शरण घेण्यावाचून पर्याय नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात रविवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बोलताना गडकरी यांनी हे विधान केले आहे.

माझा पुतळा जाळा, चपलांनी मारा; पण देशाची संपत्ती जाळू नका! – मोदींचे आवाहन

हिंदू असणे पाप आहे का? असा सवाल उपस्थित करत नितीन गडकरी यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर भाष्य केले. गडकरी म्हणाले की, या तीन देशांसह आपल्या देशातील मुसलमानांना आश्रय देण्यासाठी जवळपास 100 ते 150 मुस्लीम राष्ट्र आहेत. मात्र पाकिस्तानातले हिंदू 19 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आले असून त्यांना हिंदुस्थानशिवाय अन्य कोणताही देश आश्रयासाठी नाही. तसेच या तीन देशातून आलेल्या मुसलमानांना शरणार्थी म्हणू शकत नाही, मात्र हिंदू, जैन, पारसी, शिख आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना शरणार्थी म्हणू शकतो, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

घुसखोर आणि शरणार्थीमध्ये काय आहे फरक? पंतप्रधान म्हणतात…

गडकरी पुढे म्हणाले की, महत्मा गांधी आणि पंडीत नेहरू यांनी शरणार्थींना आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते. आपण ते पूर्ण करायला हवे. आपले सरकार तेच काम करत असून शरणार्थींना नागरिकत्व देणार आहे. यात सरकारचे काय चुकले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेसने मुस्लिमांना केवळ वोटबँक मशीन म्हणून वागणूक दिल्याची टिकाही गडकरींनी केली. त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असे आवाहनही गडकरी यांनी केले.