
ऍपल कंपनीने आपले प्रॉडक्ट आणि ऑपरेटिंग प्रॉडक्ट सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. तसेच लोकांना खास आव्हान दिले आहे. कंपनीने सिक्युरिटी बाऊंटी प्रोग्रॅम घोषित करत, जी व्यक्ती कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये त्रुटी शोधून काढेल, त्याला बक्षीस म्हणून 10. 7 कोटी रुपये देणार असल्याचेही सांगितले आहे. ऍपलने याआधीही अनेकदा युजर्सला बग शोधण्याचे आव्हान दिले आहे. तसेच त्रुटी शोधणाऱयाला मोठी रक्कम बक्षीस म्हणूनही दिली आहे. आताही ऍपलने म्हटले आहे की, जर तुम्ही कंपनीला माहीत नसलेली त्रुटी शोधून काढली व ती संबंधित डेव्हलपरसाठी विशेष असेल तर 50 टक्के बोनसदेखील दिला जाईल.



























































