
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहून टीका केल्याबद्दल हिरामण तिकारी या व्यक्तीला मारहाण करून मुंडण करण्यात आले होते. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान कोळंबेकर, श्रीकांत यादक या चार शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणी युवासेना सहसचिव माजी नगरसेवक ऍड. मेराज शेख यांनी कायदेशीर बाजू मांडत सर्व शिवसैनिकांची जामिनावर मुक्तता करून घेतली. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, विधानसभा संघटक दत्ताजी शिंदे, उपविभागप्रमुख शरद गावकर, विनायक तांडेल, गोपाळ शेलार, नगरसेवक रामदास कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


























































