17 जानेवारीपासून अहमदाबाद-मुंबई ‘तेजस’ धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 17 जानेवारीपासून अहमदाबाद-मुंबई खासगी तेजस ट्रेन धावणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) शनिवारी ही माहिती दिली.  17 जानेवारीला अहमदाबाद-मुंबई मार्गावर तेजस ट्रेनचे उद्घाटन होणार असून प्रत्यक्षात 19 जानेवारीला या ट्रेनचे लोकार्पण होईल. यापूर्वी अशी खासगी तेजस ट्रेन दिल्ली-लखनौ या मार्गावर सुरू करण्यात आली आहे.