
पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकाविणाऱ्या रिक्षाचालकास अलंकार पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून सोनसाखळी आणि रिक्षा असा 2 लाख 37 हजारांचा ऐवज जप्त केला. शंकर बबन हनमघर असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकाविणारा रिक्षाचालक अलंकार पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मोकळया जागेत येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप धनवटे आणि योगेश बडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शंकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकाविल्यची कबुली दिली.






























































