अमेरिकन सैन्याची ‘टीक टॉक’ वर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiktok-f

लोकप्रिय चायनीज अॅप असलेल्या TikTok वर अमेरिकन सैन्याने बंदी घातली आहे. चीन या अॅपचा वापर हेरगिरी करण्यासाठी करू शकतो. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर टीकटॉकच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे अमेरिकन सैन्याने स्पष्ट केले आहे.

मिलिट्री डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते लेफ्टंनट कर्नल रॉबीन ओहा यांनी सांगितले आहे की TikTok म्हणजे सायबरला धोका आहे. Bytedance च्या Tik Tok अॅपचा वापर अमेरिकन सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे सावधगिरी म्हणून या अॅपचा वापर न करण्याच्या सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच हे अॅप डाऊनलोड करताना किंवा डॉऊल लोड केल्यानंतर सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचेही ओहा यांनी म्हटले आहे. तसेच हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर यूजरचा डेटा हॅक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.