दीपिकाच्या बिल्डींगमध्ये रणवीरने घेतले भाड्याने घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाजीराव मस्तानी फेम दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलीवूडमधलं फेवरेट कपल आहे. दोघांना एकत्र बघणे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. त्यांची ऑनस्क्रीन जोडी जेवढी हीट आहे तेवढ्याच त्यांच्या रियल लाईफ केमेस्ट्रीनेही चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. मात्र दोघांत सगळं आलबेल असतानाही रणवीरने दीपिकाच्या प्रभादेवी येथील इमारतीमध्ये भाड्याने घर घेतल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे. रणवीरच्या या भाड्याचे घराचे रजिस्ट्रेशन झाले असून लवकरच तो तिथे शिफ्ट होणार आहे. प्रभादेवीतील ब्यूमोंडे टावर्स मध्ये 26 व्या मजल्यावर दीपिकाचा चार बेडरुमचा फ्लॅट आहे. त्याच बिल्डींगमध्ये रणवीरने तीन वर्षासाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. य़ा फ्लॅटचे भाडे दरमहा 7.25 लाख रुपये आहे. पण रणवीरला तीन वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्याने हवा असल्याने त्याला 7.97 लाख रुपये यासाठी मोजावे लागणार आहेत.