पैसे दिले तरच पुरस्कार सोहळ्यांना जातो- रोहित शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षात पुरस्कार सोहळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणाल वाढले आहे. प्रत्येत चॅनेल,ब्रँड, इव्हेंट कंपनीचा एक वेगळा पुरस्कार सोहळा असतो. या पुरस्कार सोहळ्यांना चित्रपट सृष्टी व छोट्या पडद्यावरील सर्व कलाकार आवर्जुन उपस्थित असतात. मात्र दिग्दर्शक रोहित शेट्टी याने मात्र हे असे पुरस्कार सोहळे खोटे असतात असे सांगितले आहे.

रोहित शेट्टी नुकतेच नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये आले होते. त्यावेळी या पुरस्कार सोहळ्यांविषयी विचारले असतात पुरस्कार सोहळे एखाद्या मालिकेसारखेच असतात. सर्व काही बनावट. ‘हे असे पुरस्कार सोहळे अत्यंत फेक असतात. मी निवेदन करायला पैसे देणार असतील तर किंवा माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असेल तरच या सोहळ्यांना उपस्थित राहतो’, असे रोहित शेट्टी याने सांगितले आहे.