
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे हवाई छायाचित्रण केले. त्या छायाचित्र व माहितीवर आधारित ‘दैनिक सामना’ने काढलेली 2020 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत व ग्रुप सीईओ राजेंद्र भागवत, प्रबोधन प्रकाशनचे संचालक विवेक कदम, वाडेकर, सहाय्यक संपादक अतुल जोशी, जिल्हा प्रतिनिधी राजेश देशमाने यांचे हस्ते झाले.
त्यानंतर ‘सामना’ची ही दिनदर्शिका शेगाव येथे श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, वाचकांना देण्यात आली. त्यावेळी या सामनाच्या दिनदर्शिकेचे सर्वांनी कौतुक केले आहे.
































































