
मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यात एक संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथे शिकवणी घेणाऱ्या एका तरुणीने वर्गातील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला आणि याचा व्हिडीओ बनवून ब्रॉयफ्रेंडला पाठवला. पीडित मुलींनी शिक्षिकेचे हे दुष्कृत्य आपल्या आईला सांगितले. यानंतर या प्रकरणी महू (आंबेडकरनगर) पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकवणी घेणाऱ्या तरुणीने वर्गातील सहा आणि तीन वर्षांच्या विद्यार्थिनींचे कपडे काढले आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घातली. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे शिक्षिकेने याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो आपल्या बॉयफ्रेंडला पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय शिक्षिकेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.
महू (आंबेडकरनगर) पोलीस स्थानकाचे प्रमुख अभय नेमा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, पीडित मुली आपल्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणीकडे शिकवणीसाठी जात होत्या. शिकवणी सुरु असताना तरुणीने मुलींचे कपडे काढून त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घातली आणि याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. पीडित मुलींना वेदना होऊ लागल्यानंतर आरोपी तरुणीने त्यांना कपडे घातले आणि पुन्हा शिकवणी सुरु केली. पीडित मुलींनी ही गोष्ट घरच्यांना सांगितले तेव्हा त्यांनी आधी शिकवणी घेणाऱ्या तरुणीला मारहाण केली आणइ नंतर पोलिसांमध्ये धाव घेतली.
या प्रकरणी पोलिस स्थानकात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार संबंधीत कलमांतर्गत आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला आणि त्याच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने तुरुंगात धाडले आहे.




























































