देशात दर दिवशी सरासरी 91 बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2018मध्ये देशभरात 50 लाख 74 हजार 634 गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशात दर दिवसाला 91 बलात्कार होत झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच दररोज सरासरी 80 खून आणि 289 अपहरणाच्या घटना घडल्या आहेत.

2017 या वर्षात 50 लाख 7 हजार 44 गुन्हे घडले होते. त्यात 2018 साली 1.3 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही या आकडेवारीवरून उघड होत आहे. 2018 साली अपहरणाच्या 1 लाख 5 हजार 536 गुह्यांची नोंद झाली. यात तब्बल 80 हजार 871 मुलींचे अपहरण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यातही 48 हजार 106 गुन्हे तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे आहेत. विशेष म्हणजे 2018 या वर्षात महिलांबाबत झालेल्या गुह्यांमध्ये 31.9 टक्के गुन्हे हे पती आणि सासरकडच्या लोकांकडूनच घडलेले आहेत, असेही अहवालात आहे.