
नागरिकत्व कायदा दुरुस्ती कायद्यावरून खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांच्या विरोधात जाणारा कायदा आहे. म्हणून आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत, तसेच एनआरसी हे गरीबांच्या विरोधात आहे असेही ओवेसी म्हणाले.
ओवेसी म्हणाले की, “नवीन नागरकत्व दुरुस्ती कायदा हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांच्या विरोधात आहे. अफगाणिस्तात, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला नागरिकत्व मिळणार नाही याबाबत मला काहीच तक्रार नाही.” परंतु जेव्हा देशात एनआरसी लागू केली जाईल तेव्हा धर्माच्या आधारावर नागरिकत्व लागू केले जाईल असे ओवेसी म्हणाले.
तसेच हा कायदा फक्त मुस्लिमांच्या नव्हे तर हिंदू बांधवांच्याही विरोधात आहे असे ओवेसी म्हणाले. हा कायदा दलितांच्याही विरोधात आहे आणि हे मी खूप जबाबदारीने सांगत आहे असेही ओवेसी म्हणाले.






























































