अत्यानंदासाठी नको तिथे स्टीलची रिंग घातली, जे.जे रुग्णालयात व्यक्तीवर किचकट शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी 40 वर्षांच्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. या व्यक्तीने त्याच्या गुप्तांगामध्ये स्टीलची रिंग घातली होती. 3 मिलीमीटरच्या या रिंगमुळे या माणसाला असह्य वेदना व्हायला लागल्या होत्या, त्याचा जीव जाण्याची पाळी आली होती. डॉक्टरांनी अत्यंत किचकट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करत या माणसाची वेदनांपासून सुटका केली आणि त्याचा जीव वाचवला.

ही रिंग कापण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यांनी ही रिंग कटरच्या सहाय्याने कापून रुग्णाची सुटका केली. डॉक्टरांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की या व्यक्तिला कोणीतरी सांगितलं की संभोगाचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर गुप्तांगावर रिंग घाल. या सल्ल्यावर भरवसा ठेवून या व्यक्तीने घरात सापडलेली एक ‘कोनाकृती’ रिंग घातली. काही वेळात ही रिंग घट्ट बसली आणि काही केल्या निघेनाशी झाली. काहीवेळानंतर ही रिंग गळून पडेल असं या व्यक्तिला वाटलं होतं.आज पडेल, उद्या पडेल या आशेवर असलेल्या या व्यक्तीने आठवडाभर या व्यक्तीने त्रास सहन केला. घरच्यांना सांगितली तर लाज जाईल या भीतीने त्याने त्रास सहन केला.

काही दिवसांनी या व्यक्तीला लघवी होणं बंद झालं, ज्यामुळे वेदना अजून वाढल्या. अखेर या व्यक्तीला जे.जे.रुग्णालयात आणण्याच आलं. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर कळालं की त्याच्या गुप्तांगाच्या कातडीवर गँगरीन झालं आहे. नसा सुजल्याने ही रिंग घट्ट रूतून बसल्याचंही त्यांना कळालं. ही रिंग काढायची असेल तर ती कापूनच काढावी लागणार होती. त्यासाठीचं कटर हे रुग्णालयात उपलब्ध नव्हतं. या कटरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. या अधिकाऱ्यांनी एका खासगी कंत्राटदाराशी संपर्क साधला आणि कटर मिळवून दिलं. कटर मिळाल्यानंर मध्यरात्री ते कापण्याची प्रक्रिया सुरु झाली.

रिंग कापून काढल्यानंतर डॉक्टरांनी गँगरीन झालेली त्वचा शस्त्रक्रियेने काढून टाकली. हळूहळू या व्यक्तीची प्रकृती सुधारेल आणि त्याच्या वेदनाही कमी होतील असं डॉक्टरांनी सांगितले आहे. कोणाचाही सल्ला ऐकून आनंद मिळवण्यासाठी अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नसे असा सल्ला ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.