
विदेशी बनावटीची 2 पिस्तुले व 6 जिवंत काडतूसासह मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचेकडून अटक करण्यात आली आहे. दिनांक 29 रोजी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या म.स पोनि. राणी काळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत नवघर गांव, ता.उरण, जि. रायगड येथे एक इसम बेकायदेशीर पिस्तुल जवळ बाळगून विक्री करण्याकरता येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्यानंतर तेथे मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून राजेशकुमार रामफेर बिंद (45, ट्रक चालक, सध्या राहणार- वडाळा, मुंबई मूळ राहणार- जौनपूर,उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. तकडून जपान आणि अमेरिकन बनावटीची दोन पिस्तुले आणि 6 काडतूसे जप्त करण्यात आली.
त्याच्याविरुद्ध उरण पोलीस ठाणे भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई गन्हे विभागाचे मध्यवर्ती शाखेचे पोलिस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर, पोलिस निरिक्षक डी.एम. भेदोडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी काळे यांच्या चमुने ही कामगिरी केली असून ते पुढील तपास करत आहेत.































































