अर्थसंकल्पामुळे बाजाराची निराशा; मुंबई शेअर बाजार 700 अंकांनी गडगडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात बाजारासाठी आणि सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतूदी करण्यात येतील, त्यामुळे बाजार तेजीत येईल, अशा शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची निराश झाली आणि त्यांनी जोरदार विक्री केल्याने शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजारात दुपारच्या सत्रात निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली. मात्र, अर्थसंकल्पाने निराशा झाल्याने बाजार कोसळण्यास सुरुवात झाली. निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक 700 अंकांनी कोसळला.

स्थावर मालमत्ता, उत्पादन क्षेत्र, एफएमसीजीसह कृषी आणि वित्त संस्था, बँकांच्या शेअरवर अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून आला. आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर शुक्रवारी निर्देशांक 190.33 अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्ये 73.70 अंकांची घसरण झाली होती. अर्थसंकल्प सादर झाल्यावर अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येतील, आणि बाजार उसळी घेईल, अशी आशा बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाली. अर्थव्यवस्थेला उभारी देतील अशा कोणत्याही घोषणा झाल्या नसल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि बाजार कोसळला.