1 / 9
प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये ब्रेड, हवाबंद मिठाई, स्नॅक्स, साखरमिश्रित पेये, बंद पाकिटातील मांस या पदार्थामुळे कर्करोगाचा धोका असतो.
प्रक्रियात्मक मांस ताजे राहण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
सॉस, हॅम, बेकन, हॉट डॉग आणि बंद पाकिटातील मांस यासारखे पदार्थही कर्करोगाला आमंत्रण देत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवनाने तोंडाचा, गळ्याचा, यकृताचा आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच अंमली पदार्थांमुळे कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
































































