
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केवळ विरोधकांचेच नाही तर भाजपच्या नेत्यांचेही फोन टॅप केले जात होते अशी माहिती आहे. एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केला जात असल्याची माहिती पुढे आली असून या प्रकरणाचीदेखील चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या. निनावी पत्राद्वारे फोन टॅपिंगची माहिती देण्यात आली आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. फडणकीस सरकारमध्ये महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. विधानसभा निवडणुकीपूर्की एकनाथ खडसे हे भाजपविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. त्या काळात त्यांचाही फोन टॅप झाल्याची शक्यता आहे.





























































