
छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी बीजापूर येथील पामेड गावात ही चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे.
सोमवारी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्लासाठी नक्षलवाद्यांनी ताफ्यावर आधीपासूनच पाळत ठेवली असल्याची माहिती मिळत आहे. हल्ला झाल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली होती.
























































