
- सिसोदिया यांनी पिछाडी भरून काढत आघाडी घेतली
- भाजपच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 18 वरून 15 झाली
- ‘आप’च्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 52 वरून 55 झाली
- पडपटगंज मतदारसंघात सिसोदिया यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रविंदर सिंह नेगी दीड हजार मतांनी पुढे
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पिछाडीवर
- आप -52 जागांवर तर भाजप 18 जागांवर आघाडीवर
- निवडणूक आयोगाने 70 जागांसाठीचे कल जाहीर केले
- मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यात केजरीवाल यांच्यासमोर आम्ही कमी पडलो- सुधीर मुनगंटीवार
- तिवारी यांनी भाजपला 48 जागा मिळतील, माझे ट्विट जपून ठेवा असे एक ट्विट केलं होतं
- थोडं थांबा, मी अजूनही आशावादी आहे- मनोज तिवारी, दिल्ली भाजपचे अध्यक्ष
- काँग्रेसला पुन्हा भोपळाच मिळण्याची शक्यता
- निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कलांनुसार देखील आपला बहुमत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे
- आप 45 जागांवर तर भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे
- निवडणूक आयोगाने 70 पैकी 64 जागांचे कल जाहीर केले
- आपचे 32 तर भाजपचे 16 उमेदवार आघाडीवर- निवडणूक आयोग
- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आपच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 22 वरून 26 झाली
- नव्या आकड्यांनुसार आपचे 22 तर भाजपचे 14 उमेदवार आघाडीवर
- निवडणूक आयोगाच्या आकड्यांमुळे आपमध्ये चिंतेचं वातावरण पसरायला सुरुवात
- निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार आपचे 18 तर भाजपचे 11 उमेदवार आघाडीवर
- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आप आणि भाजपचे प्रत्येकी 10 उमेदवार आघाडीवर
- निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आपचे 7 तर भाजपचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत.
- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कल जाहीर करायला सुरुवात झाली
- ‘हा अहंकाराचा पराभव आहे’, दिल्ली निकालांवरून नवाब मलिक यांची भाजपवर टीका
महाराष्ट्र सरकार में मंत्री नवाब मलिक: दिल्ली चुनाव नतीजों के शुरुआती रुझान दिखा रहे हैं कि घमंड की हार हुई है, विश्वास और विकास को जीत मिली है। दिल्ली के लोगों ने भाजपा को ‘एंटी नेशनल’ घोषित किया है। pic.twitter.com/7CottGQJq3
— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2020
- आपच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 53 वरून 55 झाली
Delhi result – भाजपचे ‘तीन-तेरा’, कोणत्या जागांवर भाजप पुढे?
- भाजपच्या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या 16 वरून 14 झाली. काँग्रेसच्या उमेदवाराची आघाडीही गेली
- 53 जागांवर आपचे उमेदवार, 16 जागांवर भाजपचे उमेदवार आणि 1 जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर
- सगळ्या जागांसाठीचे कल स्पष्ट झाले
- ‘आप’ पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेल्या अलका लांबा पराभूत होण्याची शक्यता
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातून निघाले, कार्यालयात पोहचून मीडियाशी संवाद साधणार
- आम्ही जिंकणार, आम्हीच सरकार बनवणार- भाजप नेता रमेश खन्ना
- हे सगळे आकडे आघाडी-पिछाडीचे आहेत, अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे
- आप 44 जागांवर, भाजप 11 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
- दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट
- 70 पैकी 36 जागांवर ‘आप’ आघाडीवर असून सुरुवातीचे कल पाहता आप पुन्हा सत्तेत येणार अशी चिन्हे आहेत
- सुरुवातीच्या कलांवरून ‘आप’ ही बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसत आहे.
- ‘आप’ला मोठा विजय मिळेल- आपचे नेते संजय सिंह
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आघाडीवर
- आप 10 जागांवर तर भाजप 5 जागांवर आघाडीवर
- सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात
- पोस्टाने आलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात
- 8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मतदान झाले होते
- दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आहेत
- ‘आप’ च्या विजयासाठी कानपूरमध्ये समर्थकांनी होमहवन केले
- आम्ही पुन्हा जिंकणार कारण आम्ही गेली 5 वर्षे जनतेची कामे केली आहेत- मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री
- भाजप कार्यालयात जल्लोषाची तयारी पूर्ण झालीय- मनोज तिवारी, दिल्ली भाजपाध्यक्ष
दिल्ली प्रदेश बीजेपी अध्यक्ष मनोज तिवारी: मैं नर्वस नहीं हूं। आज का दिन बीजेपी के लिए अच्छा होगा। बीजेपी के दफ्तर में जश्न की तैयारियां शुरू हो गई हैं। बीजेपी आज दिल्ली सरकार में आ रही है। #DelhiResults pic.twitter.com/IsccCcODnO
— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2020
- सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

























































