मुंबईचा पारा पस्तिशीपार सकाळपासूनच लाहीलाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीने मुंबईकडे पाठ फिरवताच पाऱयाने थेट पस्तिशीपार उसळी घेतली. मंगळवारी शहरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांची वाढ झाली. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. सांताक्रूझमधील कमाल तापमान 35.2 अंशांवर गेले. हे तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी अधिक होते. याच वेळी किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांची वाढ होऊन ते 22.4 अंश इतके नोंद झाले.