चुका दाखवाच, पण जनतेला जागरूकही करा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मीडियाला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसारमाध्यमांनी सरकारच्या कार्यपद्धतीतील चुका नक्कीच दाखवाव्यात, पण जनतेला जागरूक करण्याचेही काम करावे, दिशा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केले. देशातील अनेक नागरिक कर भरत नाहीत. त्याचा प्रामाणिक करदात्यांना फटका बसतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने याचा विचार करून प्रामाणिकपणे कर भरावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सर्वांत कमी कर असणाऱया देशांच्या यादीत हिंदुस्थानचा समावेश होतो. करातून येणाऱया उत्पन्नांचा उपयोग सरकार कल्याणकारी योजनांसाठी करते. कराच्या पैशांतूनच विकासाला गती मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कर भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करप्रणाली ठेवली आहे, असेही त्यांनी नमूद केले. देशातील बहुतांश लोक कर भरत नाहीत. कर न देण्याचे वेगवेगळे मार्ग ते शोधतात. याचा भुर्दंड प्रामाणिक कर भरणाऱयांना सहन करावा लागतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आठ महिन्यांत निर्णयांची सेंच्युरी

सरकारने मागील आठ महिन्यांत निर्णयांचे शतक पूर्ण केले. शेतकऱयांना भत्ता, ट्रान्सजेंडरांना अधिकार देणारा कायदा, नॅशनल मेडिकल कमिशन ऍक्ट, रस्ते अपघात रोखणारा कायदा, बोडो शांती समझोता, अयोध्येतील भक्य राममंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करणे, जम्मू-कश्मीरातील कलम 370 हटवणे, जम्मू- कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवणे असे निर्णय घेतले गेल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आठवा!

चालू दशक 130 कोटी जनतेच्या स्कप्नांचे आणि विश्वासाचे असेल, हे दशक स्टार्टअपचे असेल. हिंदुस्थान संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. वाॅटर एफिशियंट आणि वाॅटर सफिशियंट हिंदुस्थानचे दशक असेल असे नमूद करतानाच पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली. आपणा सर्वांना देशासाठी जगायचे आहे. त्यामुळे देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आठवा आणि काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

रुग्णांवर उपचारांबरोबरच कोरोना विषाणूंचाही कायमचा बंदोबस्त करण्यासाठी चीनने बऱयाच उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाविरुद्ध काम करणाऱया माणसांनाही त्या विषाणूंची लागण होत असल्याने आता चीनने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. कोरोनाचा कर्दनकाळ ठरतील, असे डॉक्टर रोबो चीनने याकामी मैदानात उतरवले आहेत. हे रोबो विविध ठिकाणी उतरवले जात आहेत. कोरोना प्रतिबंधक फवारणी करणारे हे रोबो आहेत. पूर्व चीनच्या शानडोंग प्रांतातील छिंगदाओ येथून या रोबोंची टीम सज्ज करून कोरोनाग्रस्त भागांत पाठवली गेली आहे.