
राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी 15 ते 29 फेब्रुवारी या 15 दिवसांसाठी वाहनधारकांना देशभर मोफत फास्टॅग उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
.
एरवी फास्टॅगसाठी 100 शुल्क आकारले जाते. या 15 दिवसांत हे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र फास्टॅगसाठी ठेवावी लागणारी अनामत रक्कम आणि वॅलेटमध्ये ठेवावी लागणारी किमान शिल्लक याविषयीचे नियम पूर्वीप्रमाणेच लागू असतील.
महामार्गावरील टोलनाके, आरटीओ कार्यालये, कॉमन सर्व्हिस सेंटर, ट्रान्सपोर्ट हब आणि पेट्रोल पंप अशा ठिकाणी निŠशुल्क फास्टॅग मिळू शकते. यासंबंधी माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1033 वर कॉल करावा.





























































