अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी 300 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

जुलै ते ऑगस्ट 2019 या काळात झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर आता तत्काळ या कर्जमाफीसाठी 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून कार्यक्रम खर्चाच्या योजनेंतर्गत असलेल्या निधीपैकी 300 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्यात आला आहे.

जुलै ते ऑगस्ट 2019 या काळात कोकण, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अन्य शेतकऱयांप्रमाणे जुलैत ते ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱयांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. त्यानंतर यासाठीचा आवश्यक असलेला 300 कोटींचा निधी तत्काळ वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. हा निधी वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव असलेल्या निधीतून तत्काळ या शेतकऱयांसाठी वळविण्यात आला. हा निधी वितरीत करण्याची जबाबदारी सहकार आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतच्या खर्चाचा अहवाल संबंधित कार्यालयाने वेळोवेळी सरकारला पाठवण्यात येणार आहे.