राज्यात आणि केंद्रात वेगळे सरकार असले तरी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न- खा. सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधकांनी दिलदारपणे टिका करावी, सरकारची पाच वर्षे कशी निघून जातील ते कळणारही नाही, शहरी व ग्रामीण असे न करता समतोल न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खासदार सु्प्रिया सुळे यांनी आज केले. नगरजिल्ह्यातील थत्ते मैदानावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी  पद्मश्री सन्मानीत  राहिबाई पोपेरे, पोपटराव पवार व जहीर खान यांचा  सत्कार करण्यात आला.

खासदार सुळे म्हणाल्या, राज्यातील महाआघाडी सरकार चांगला व वेगात विकास कसा होईल, ही महत्वाची जबाबदारी आहे. ती समर्थपणे पार पाडू. केंद्र सरकारकडून 15 हजार कोटी रुपये जीएसटीचे येणे असल्याने विकासाच्या अडचणी आल्या आहेत. राज्य व केंद्रात वेगळ्या विचारांचे सरकार असले तरी सर्वांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांनी दिलेल्या महिला आरक्षणामुळे त्या घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा देत काम करत आहेत. आर. आर. पाटील यांनी स्वच्छता अभियान सुरु केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही हे अभियान राबवित असल्याचे सुळे यांनी सांगितले. तसेच स्वच्छता हा शहराचा पहिला गुण असल्याने त्या बाबतीत कोणी राजकारण करू नये. नोकर भरतीत पारदर्ताशकता येण्यासाठी महापोर्टल बंद करण्यात अल्याचे त्यांनी सांगून पक्षाची व विचारांची निष्ठा असणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे खुले असल्याचेही त्यांनी सांगितले.