
केंद्र सरकारच्या वतीने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ करण्यात येत असल्याने देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जेवण महागणार आहे. केंद्र शासनाने विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ केली असून, आजपासून महानगरमध्ये गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू करण्यात आल्या आहेत.
आजपासून लागू करण्यात आलेल्या गॅसच्या किमतीत 145 रुपयांनी किमती वाढून आता एका गॅस सिलिंडर मागे 829, रुपये 50 पैसे प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गॅस सिलिंडरच्या राज्याप्रमाणे वाढलेल्या किमती पुढीलप्रमाणे महाराष्ट्र- 149, 50, दिल्लीतील गॅस सिलिंडरच्या काढलेली किंमत 149 रुपये , कोलकातामध्ये 149 रुपये प्रमाणे, चेन्नईमध्ये 147 रुपये अशा प्रकारे भरमसाठ किमती वाढवून हे मोदी सरकार देशातील नागरिकांची लूट करीत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगून, नरेंद्र मोदीचे केन्द्रात सरकार आल्यापासून काढलेल्या किमती 2014 मध्ये 453, 2015 मध्ये 662 रुपये, 2016 मध्ये 548 रूपये, 2017 मध्ये 763 रुपये, 2018 मध्ये 663 रुपये, 2019 मध्ये 716 रुपये, आणि 2020मध्ये 868, रुपये 50 पैसेप्रमाणे भरमसाठ अशा गॅस सिलिंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत.
एकंदरीत या वाढवलेल्या गॅसच्या किमतीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक मध्यवर्गीयांची आर्थिक लूट होत असून, या काढलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा (ग्रामीण) च्या जिल्हा अध्यक्ष कल्पना शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिनाल पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष) जयश्री पाटील (जिल्हा सरचिटणीस) अर्चना कदम, शोभा भोईटे, कमल पाटील, आशा अंबोरे, आशा चाकरीया, सकीना तडवी, पिनास फनीबंदा, राष्ट्रवादीच्या यावल तालुका महिला काँग्रेसच्या द्वारका पाटील, उपाध्यक्षा उषा निळे, मीनाक्षी चव्हाण (जिल्हा उपाध्यक्षा), रा. काँ. महिला उपाध्यक्षा सुरेखा पारधे आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या प्रसंगी शिष्टमंडळात सहभाग घेतला, यावेळी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.
























































